Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'चिन्ह आणि नावासाठी 2000 कोटींचा सौदा झाला...'; संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

Ruchika Jadhav

Sanjay Raut : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही शिंदे गटाला दिले आहेत. याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. सध्या या मुद्द्यावरून ठाकरे गटातील पदाधीकारी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करत आहेत. अशात आता खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. चिन्ह आणि नाव या दोन्ही गोष्टी विकत घेतल्या आहेत, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut Latest News)

त्यांनी केलेल्या आरोपांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

माझी पक्की खात्री आहे चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

यासह त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळी असलेला एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, 'ही न्याय व्यवस्था काहीकांची... झाली, ही संसद देखील ... हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!', असं यामध्ये लिहिलं आहे.

राऊतांना ही माहिती कुणी दिली?

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मी हे खात्रीने बोलत आहे. लवकच पुरावे येतील, जे मुख्यमंत्री आमदार आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात. ते पक्ष शिवसेना आणि नाव विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करतील याचा तुम्ही विचार करा. माझ्याकडे पक्की माहिती आहे, हा न्याय नाही हा सौदा आहे. आतापर्यंत २ हजार कोटी खर्च झालेत. पुढच्या गोष्टी मी नंतर सांगेल. त्यांच्याच मित्रपरीवारातील बिल्डरांनी ही माहिती दिली,असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT