Sanjay Mandlik Saam Tv
महाराष्ट्र

sanjay mandlik : कोल्हापूरबद्दल व्हिजन काय? संजय मंडलिक मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नावर बोलले

Sanjay mandlik Latest news : 'कोल्हापूरची जनता ही विकासाला मतदान करते. माझ्या केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून 2024 ला जनता पुन्हा मलाच खासदार म्हणून निवडून देईल. तसेच यावेळी मंडलिक यांनी कोल्हापूरच्या महत्वाच्या प्रश्नावर भाष्य केलं.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर : लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आज सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करताना संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या व्हिजनबद्दल मोठं भाष्य केले. 'कोल्हापूरची जनता ही विकासाला मतदान करते. माझ्या केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून 2024 ला जनता पुन्हा मलाच खासदार म्हणून निवडून देईल. तसेच यावेळी मंडलिक यांनी कोल्हापूरच्या महत्वाच्या प्रश्नावर भाष्य केलं.

कोल्हापूरच्या प्रश्नावर भाष्य करताना संजय मंडलिक म्हणाले, 'कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्न होते, ते पाच वर्षांत पूर्ण झाले. त्यात काही राहिले आहेत. खंडपीठ स्थापन करण्याला प्राधान्य राहील. पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करणे. कोल्हापुरात आयटी क्षेत्र विकसित होणे. कोल्हापूरला धार्मिक पर्यटनांचं केंद्र करणे हे माझं व्हिजन आहे'.

'कोल्हापुरात खऱ्या अर्थाने शेतजमीनाला पाणी मिळावे. आता घराघरात पाणी जात आहे. या भागात रोजगार निर्माण व्हावे. ही तरुणांची मोठी मागणी आहे. त्यामुळे आयटी क्षेत्र विकसित करण्याचं लक्ष्य राहील, असे ते पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विशेष लक्ष्य कोल्हापूरवर आहे. याबाबत बोलताना मंडलिक म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांचा स्वभावच आहे की, ते कोणतीही गोष्ट मायक्रो प्लानिंगने करतात. त्यांना मुख्य नेता असल्याचं भान असतं. प्रत्येक निवडणुकीत त्यांचं अशाच प्रकारे लक्ष घालतात. त्यामुळे ते यशस्वी मुख्यमंत्री आहेत'.

'मी प्रतिस्पर्ध्याकडे पाहून निवडणुकीला उभा राहिलो नाही. या मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे. दुसऱ्या बाजूला कोण मोठं कोण लहान याचा विचार करत नाही, असे विरोधी पक्षाच्या उमेदवारावर मंडलिक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

SCROLL FOR NEXT