Kolhapur local elections BJP 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप, ठाकरेंना हादरे; दिग्गज नेत्याने साथ सोडली

Sanjay Ghatge joins BJP : कागलचे माजी आमदार संजय घाटगे व मुलगा अंबरीश घाटगे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Kolhapur local elections BJP : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात भूकंप झालाय, त्याचे हादरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसले आहेत. कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांचा मुलगा अंबरीश घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. संजय घाटगे यांच्या जाण्याचा फटका ठाकरेंना बसणार आहे. ठाकरेंची कोल्हापूरमधील ताकद कमी झाली आहे. घाटगे आज दुपारी कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत भाजपात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपासून घाटगे हे भाजपच्या संपर्कात होते. जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व्हाया ठाकरेंची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

संजय घाटगे यांचा स्थानिक राजकारणात चांगलाच दबदबा आहे. त्यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. कागलमधील अनेक सामाजिक आणि सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे सुपुत्र अंबरीश घाटगे हेही तरुण नेतृत्व म्हणून कागलमध्ये चर्चेत आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्याआधी भाजपने एकाचवेळी ठाकरे आणि पवार यांना धक्का दिला आहे. संजय घाटगे ठाकरेंच्या शिवसेनेत होते, आता ते भाजपात जात आहेत. संजय घाटगे यांना ताकद देत फडणवीस यांच्याकडून समरजीत घाटगे यांना धक्का दिला जाईल. विधानसभेच्या तोंडावर समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकला होता. आता संजय घाटगे आणि अंबरीश घाटगे यांच्या भाजपा प्रवेशामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT