राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

नरेंद्र महाराज प्रतिष्ठानतर्फे महाड मध्ये स्वच्छता मोहीम

संपुर्ण महाडमध्ये झालेला हा चिखल साफ करण्यासाठी नरेंद्र महाराज प्रतिष्ठानच्या आठ हजार भाविकांनी महाड कडे धाव घेतली असून तिथे स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपुर्ण महाडमध्ये झालेला हा चिखल साफ करण्यासाठी नरेंद्र महाराज प्रतिष्ठानच्या आठ हजार भाविकांनी महाड कडे धाव घेतली असून तिथे स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.Sanitation campaign in Mahad by Narendra Maharaj Pratishthan

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता पावसाचा जोर आत्ता कुठे कमी व्हायला लागला आहे.यावेळीचा महापूर अचानक आणि पाऊस भयावह होता यामध्ये अनेक ठिकाणच नुकसान झालं आहे. प्रत्येक वेळी पाऴसाला आणि महापुराला बळी पडणारे दोन विभाग प्रामुख्याने असतात ते म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि रायगड,महाड हा भाग.

हे देखील पहा-

महाड शहरात यावर्षीही महापूराने मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं आहे आता पाऊस काही प्रमाणात कमी झाला असला तरी पावसाच्या पाण्यामुळे महाडमधील सावित्री नदीला पूर आल्याने दोन दिवस पूरस्थिती झाली होती. दरवर्षी येणाऱ्या पुरस्थितीपेक्षा यावेळची स्थिती खूप कठीण होती. सारे शहर पुराच्या पाण्यात अडकले होते.आता पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात, दुकानात, तसेच बाजरपेठा, शासकीय कार्यलये अशा ठिकाणी चिखलच चिखल साचला आहे.

संपुर्ण महाडमध्ये झालेला हा चिखल साफ करण्यासाठी नरेंद्र महाराज प्रतिष्ठानच्या आठ हजार भाविकांनी महाड कडे धाव घेतली असून तिथे स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.या स्वच्छता मोहीमेअंतर्गत महाड शहरातील रस्ते, शासकीय कार्यालये, दुकाने, घरे याठिकाणी साचलेला चिखल, कचरा काढून श्रमदान करण्यात आले आहे.

तसेच शहरात रोगराई पसरू नये यासाठी सध्या शासकीय यंत्रणेसह अनेक सामाजिक संस्था स्वच्छतेसाठी महाड शहरात दाखल झाल्या आहेत.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT