Sangli District Bank Election Results: Key Leaders Secure Victory 
महाराष्ट्र

सांगलीत रोहित पाटलांना जोरदार धक्का, पडळकरकरांनी गुलाल उधळला, संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटलांचा १ मताने पराभव

Sanjaykaka Patil vs Suman Patil, Gopichand Padalkar election result : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर, संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे विजयी झाले.

Namdeo Kumbhar

Sangli District Bank Election Results: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून याचे निकाल अखेर समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे या दिग्गजांनी दणदणीत विजय मिळवून बँकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे तासगावमध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार) माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव झाला आहे.

मिरज येथील शेतकरी भवन येथे मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्राबाहेर पडळकर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि जोरदार घोषणाबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला.

जत सोसायटी गट :

जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा २० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर विनोद पवार यांना ३४ मते पडली. या विजयाने गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच जिल्हा बँकेत दणदणीत प्रवेश केला आहे.

अटीतटीच्या लढतीत संजयकाका १ मताने विजयी :

तासगावमधील लढत राज्यभरात चर्चेची ठरली. या अटीतटीच्या निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या १ मताने पराभव केला. संजयकाका पाटलांना ३९ मते तर सुमनताई पाटलांना ३८ मते मिळाली. या निकालामुळे आमदार रोहित पाटील यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

कवठेमहांकाळ सोसायटी गट :

कवठेमहांकाळ सोसायटी गटातून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय संपादन केला. त्यांनी ३७ मते मिळवत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) टी. व्ही. पाटील (३३ मते) यांचा ४ मतांनी पराभव केला.

मिरज सोसायटी गट :

मिरज सोसायटी गटात काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांनी भाजपच्या अनिल शेगूनशे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अण्णासाहेब कोरे यांना ४७ मते मिळाली, तर अनिल शेगूनशे यांना १९ मते मिळाली.

सांगली जिल्हा बँकेतील या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत असून, विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण सांगली जिल्ह्यात गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : एनसीपीए आणि एजिलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; बोनस जाहीर

Western Railway: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा! पश्चिम रेल्वेवर १७ नव्या मेल-एक्स्प्रेस धावणार; दादर-जोगेश्वरीतून होणार सुरुवात

Milk Cake Recipe: सणासुदीला बनवा घरच्या घरी दाणेदार आणि स्वादिष्ट मिल्क केक, वाचा सोपी रेसिपी

Glenn Maxwell: 'बिग शो'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम! ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा मोठा निर्णय

Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत वाढ! २०१६ च्या मारहाण प्रकरणात आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT