Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत राडा! बहिणीच्या लग्नावरून भाऊ नाराज; दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी, ६ जण गंभीर जखमी

Sangali News : सांगली जिल्ह्यात बहिणीच्या लग्नाच्या कारणावरून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत सहा जण जखमी झाले असून दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • सांगली जिल्ह्यात लग्नाच्या कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारी

  • सहा जण जखमी, महिलांनाही मारहाण

  • दोन्ही गटांनी परस्पर तक्रारी नोंदवल्या

  • ११ जणांवर गुन्हा दाखल

विजय पाटील, सांगली

सांगली जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. बहिणीच्या लग्नाच्या कारणावरुन जिल्ह्यातील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोनही कुटुंबीयांनी सांगली ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोघांच्याही फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पद्माळे येथील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश कोळी याने संशयित दिगंबर जगदाळे यांची चुलत बहिण शिवानी सुनील जगदाळे हिच्याशी लग्न केले होते. याचा राग दिगंबरला होता. पुतण्या सागर कोळी याच्या घरासमोर संशयित दुचाकीवरुन आले.

दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी घरात घुसून घरातील सदस्यांना मारहाण केली. तसेच फिर्यादी रुपाली तसेच त्यांची जाऊ रेखा आणि सुवर्णा यांना त्यांच्या घरासमोर येवून दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले असून याप्रकरणी तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Jio Recharge 90 Days: Jioचा 90 दिवसांचा स्वस्तात मस्त प्लान; डेटा, कॉलिंगसह 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT