सांगलीत खुनाचे सत्र; ST स्टँडवर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या!
सांगलीत खुनाचे सत्र; ST स्टँडवर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या! SaamTvNews
महाराष्ट्र

सांगलीत खुनाचे सत्र; ST स्टँडवर तरुणाची धारदार शस्त्राने हत्या!

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली शहरामध्ये खुनांची मालिका सुरू आहे. गेल्या दोन दिवसात दोन खून झाल्याने सांगली हादरून गेली असून नागरिकांमध्ये घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल रात्री हरिपूरमध्ये (Haripur Murder) गावगुंड टोळक्याने पती पत्नीवर खुनी हल्ला केल्यानंतर आज सायंकाळी सांगली (Sangli) सिव्हिल स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक नावाच्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे. (Sangli ST Stand Murder News)

हे देखील पहा :

रोहनचा नाईकचा (Rohan Naik) खून का व कोणी केला याचा तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत. सांगलीच्या एसटी स्टँड रोडवर उभ्या असलेल्या रोहनवर अचानकपणे अज्ञात हल्लेखोरांकडून धारदार हत्याराने पाठीमागून येऊन धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. निर्घृणपणे केलेल्या या हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाला. हल्ला झाल्यानंतर रोहनला दगडाने जबर मारहाण करत हल्लेखोर पसार झाले, यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.

खुनाच्या (Murder) घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तर घटनास्थळी बघ्याची प्रचंड गर्दी झाली होती. तर मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipes : सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत झटपट होणारा नाश्ता; 5 हेल्दी रेसिपी

Baramati Lok Sabha Votting Live: शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

Nashik Lok Sabha: नाशिक जिल्ह्यातील'या' दिग्गज उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

योगा केल्यानंतर प्या Health Drinks, आरोग्य राहील निरोगी

SCROLL FOR NEXT