Sangli Civil Hospital resident doctor killed in road accident Saam TV marathi
महाराष्ट्र

Sangli Accident : ड्युटी संपवून निघाली अन्...सांगलीत मध्यरात्री भीषण अपघात, महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Sangli Road Accident : सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत निवासी डॉक्टर डॉ. खुशी मुंदडा यांचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ड्युटी संपल्यानंतर सहकारी डॉक्टरांसोबत मोपेडवर जात असताना हा अपघात घडला.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Sangli Civil Hospital resident doctor killed in road accident : सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. खुशी पवन मुंदडा (मूळ रा. नागपूर) यांचा मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडून बाहेर पडलेल्या एका होतकरू तरुण महिला डॉक्टरचा असा अपघाती अंत झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्युटी संपल्यानंतर मध्यरात्री नाश्ता मिळतो का हे पाहण्यासाठी डॉ. खुशी मुंदडा या त्यांचे सहकारी डॉ. योगेश लढ्ढा यांच्यासोबत मोपेडवरून बाहेर पडल्या होत्या. विश्रामबाग चौकात नाश्ता न मिळाल्याने दोघे लक्ष्मी मंदिराच्या दिशेने निघाले होते.

दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रेल्वे उड्डाणपुलावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर लांब फेकले गेले. या अपघातात डॉ. खुशी मुंदडा यांच्या कमरेसह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात डॉ. योगेश लढ्ढा यांच्या चेहऱ्याला व उजव्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

या प्रकरणी डॉ. योगेश लढ्ढा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडल्यानंतर बाहेर पडलेल्या एका होतकरू तरुण डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलसह वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: नेपाळच्या पुरामध्ये 4 हजार कोटी वर्षे जुना शाळीग्राम सापडला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मोठी गॅस गळती; वाहतूक बंद, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सत्ताधारी भाजपनं कोअर कमिटीच बदलली; पक्षनेत्यांची उचलबांगडी, नेमकं काय घडलं?

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठं यश, सरकारनं धडाधड GR काढले; 17 दिवसांनी आंदोलन मागे

पुण्यात डीजेवरून राजकारण तापलं; DJ मुक्त पुण्याला गणेश मंडळांचाच विरोध

SCROLL FOR NEXT