sangli, loudspeaker, ganpati, ganeshotsav mandal, ganesh festival saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav : आवाज वाढव डीजे तुला..., पाेलिसांचं हाेतं लक्ष, चार गणेशाेत्सव मंडळं अडचणीत

गेले दाेन दिवस राज्यभरात गणेशाेत्सवाची धामधूम सुरु आहे.

विजय पाटील

Sangli Ganeshotsav : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात गणेशभक्तांनी वाजत गाजत गणरायची (ganpati) स्थापना केली. घराे घरी तसेच सार्वजनिक गणेशाेत्सव (Ganesh Utsav) मंडळांनी बाप्पांची पूजा अर्चा केली. काेराेनाचे संकट काहीशा प्रमाणात दूर झाल्याने गणेशभक्तांमध्ये माेठा उत्साह हाेता. सांगली जिल्ह्यात देखील यंदा माेठ्या उत्साहाने गणेशाेत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघटन केल्याने सांगली पाेलिसांनी चार मंडळांवर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.

गणेशाेत्सव काळात ध्वनीक्षेपक लावण्यास पाेलिस दलाकडून परवानगी देण्यात येते. ही परवानगी देताना पाेलिस मंडळांना नियमांचे उल्लंघन हाेऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन करतात. विशेषत: ध्वनीक्षेपक यंत्रणा मर्यादेत लावावी अशी सूचना करण्यात येते. दरम्यान सांगलीतील चार मंडळांकडून पाेलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन मंगळवारी झाले.

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी काही मंडळांनी गणेश मूर्ती स्थापनेची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत आधूनिक तंत्रज्ञानाचे वाद्य आणि पारंपरिक वाद्याच्या समावेश होता. या मिरवणुकीच्या बंदोबस्तामध्ये पोलिसांनी ध्वनी मर्यादा तपासणी पथक नेमले होते. या पथकाने ध्वनी मर्यादा मापन करून वेळोवेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांना समज दिली होती.

या मिरवणुकीत ध्वनी मर्यादा नियमाचे भंग केल्याने मिरजेचा सम्राट दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ भारत नगर, श्रीराम गणेश मंडळ लोणार गल्ली , शनिवार पेठचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठचा राजा गणेशोत्सव मंडळ या चार मंडळांवर ध्वनी प्रदूषण कायद्या प्रमाणे कारवाई सुरू केली आहे अशी माहिती डीवायएसपी विरकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT