arrest, sangli, shivsena, shivsainik, islampur Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : भरदिवसा पोलीस मुख्यालय परिसरात चाेरी करण्याचा प्रयत्न फसला; मिरजेतील एकास अटक

यापूर्वी झालेल्या चंदन चोरीमध्ये त्याचा सहभाग आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विजय पाटील

Sangli : सांगली पोलिस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाचे झाड कापून ते चोरीचा प्रयत्न करणाऱ्या नवाज सलीम मकानदार (वय २६) यास पाेलिसांनी रंगेहाथ पकडले. मकानदार याने भरदिवसा करवतीने चंदानाचे झाड कापण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांच्या (police) सतर्कतेमुळं त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं. (Sangli Crime News)

पाेलिस मुख्यालयाचा परिसर खूप मोठा आहे. या परिसरात चंदनाची झाडेही खूप आहेत. अनेकदा झाडाचे बुंदे कापून ते चोरीला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर टिकेची झोड उठल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) या चोरीचा छडा लावला होता. यामध्येही मिरजेतील दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली होती. आता अटक केलेला नवाज मकानदार हाही मिरजेतील (Miraj) आहे.

मुख्यालयातील पोलिस शिपाई विजय म्हारगुडे हे गुरुवारी दुपारी जेवण करण्यास घरी निघाले होते. उगवून आलेल्या चंदनाच्या झाडाचा बुंदा करवतीने कापताना त्यांना आवाज आला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले. त्यावेळी एकजण झाड कापताना त्यांना दिसला. म्हारगुडे यांना पाहताच त्याने करवत टाकून पलायन केले. त्यानंतर म्हारगुडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही पोलिसांनी पाठलाग करून त्या व्यक्तीस पकडलं. त्याच्या ताब्यातून करवत जप्त करण्यात आली.

त्यानंतर मकानदार यास अटक करण्यात आली. ट्राफीक पार्कजवळ नैसर्गिकरित्या पूर्वीच्या चोऱ्यांबद्दलही मकानदारची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या चंदन चोरीमध्ये त्याचा सहभाग आहे का याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT