crime news सांगली : हाॅटेल महाराजामधील चाेरीचा उलगडा केल्यानंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने sangli local crime branch महागड्या सायकल चाेरणा-या दाेन युवकांना पकडले आहे. त्यांच्याकडून दाेन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्यापैकी एकजण अल्पवयीन असून दूस-या संशयिताचे आशिष कांबळे (वय २०) असे नाव आहे.
वानलेसवाडी येथे दाेघेजण संगणक विक्रीसाठी आल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली. एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन दाेघांना हटकले असता त्यांनी आपल्याजवळील साहित्य चाेरीचे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चाैकशी केल्यानंतर त्यांनी तब्बल २३ सायकल चाेरल्याचा प्रकार समाेर आला.
या चाे-यांपैकी वानलेसवाडी येथील प्राथमिक शाळेतील संगणक, शरद या शासकीय कॉलनी, सावरकर कॉलनी, पासपोर्ट नगर आदी परिसरातून सायकल चोरल्याचे संशयित आराेपी आशिष कांबळेने सांगितले. या चोरीच्या सायकली सांगली-मिरज रस्त्यावरली मैत्रीया कंपनीच्या बंद पडलेल्या इमारतीत ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी महागड्या सायकलींसह दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान ज्यांच्या सायकल चाेरीस गेल्या आहेत त्यांनी पाेलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.