Vishal Patil Vs Rohit R R Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेतही सांगली पॅटर्न? रोहित पाटील यांच्याविरोधात विशाल पाटलांची बंडाळी?

Vishal Patil Vs Rohit R R Patil: विधानसभात ही लोकसभेतील सांगली पॅटर्न पाहायला मिळू शकतो. कारण विशाल पाटल पुन्हा एकदा मविआच्या विरोधात जाऊन बंड करू शकतात.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेला सांगलीत बंडखोरी करत विजयी झालेल्या विशाल पाटलांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे संकेत दिलेत. महाविकास आघाडीत तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यातच शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केलीय. त्यापाठोपाठ विशाल पाटलांनी तासगाव-कवठे महांकाळला अजित घोरपडेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत पुन्हा बंडखोरीचे संकेत दिलेत. त्यामुळे आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटलांच्या अडचणीत वाढ झालीय.

विशाल पाटलांनी लोकसभेला बंडखोरी करत ठाकरे गटाच्या मल्लाला आस्मान दाखवलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा कवंठे महांकाळकडे वळवलाय. विशाल पाटलांनी अजित घोरपडेंना पाठिंबा देण्याचा निर्धार केल्यामुळे मविआत पुन्हा चलबिचल सुरू झाली.

लोकसभेला पराभव झाल्यानंतर माजी खासदार संजय पाटलांनी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभेसाठी मुलगा प्रभाकर पाटलांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. तर शरद पवारांनी रोहित पाटलांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलंय. दुसरीकडे माजी मंत्री अजित घोरपडेंनी शेतकरी आघाडी स्थापन करत तासगाव-कवठे महांकाळमधून लढण्याचं जाहीर केलंय.

कोण आहेत अजित घोरपडे?

अजित घोरपडे हे आर आर पाटलांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत. 1985 मध्ये काँग्रेसला आव्हान देत जनता पक्षातून निवडणूक लढवली होती. त्यांनी 1995 मध्ये अपक्ष निवडणूक जिंकली. युतीच्या सरकारमध्ये घोरपडेंना राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. 1999 मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून विजय झाले. आघाडी सरकारमध्ये 2 वेळा मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली. 2014 मध्ये भाजपामधून निवडणूक लढवूनही त्यांचा पराभव झाला.

दरम्यान, तासगाव-कवठे महांकाळमध्ये अंजनी आणि चिंचणीचं वर्चस्व राहिलंय. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आता अजित घोरपडेंनी तिसरी आघाडी स्थापन केलीय. त्यापार्श्वभूमीवर विशाल पाटलांनी घोरपडेंच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केलाय.अजित घोरपडेंमुळे रोहित पाटलांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT