सांगली : लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. हा आनंद द्विगुनीत करण्यासाठी वधू– वरांची मोठ्या प्रमाणात हौस केली जाते. त्या हौसेला कोणतेही मोल नसते. आपले लग्न (Marriage) हटके व्हावे यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. यामध्ये महागड्या गाड्या, रथ, डोली, हेलिकॉप्टर यांचा प्रत्येकजण (Sangli News) आपापल्या कुवतीनुसार वापर करतो. अनेक लोक या सर्वांना फाटा देत जुन्या पद्धतीचे अनुकरण करू लागले आहे. महागड्या गाड्याऐवजी वरात बैलगाडीतून काढू लागले आहे. हा बैलगाडीचा (Bullock Cart) फंडा ग्रामीण भागात रुजू लागला असून शहरी लोकांसाठी बैलगाडीतील नववधूची एन्ट्री आकर्षण ठरू लागली आहे. (Latest Marathi News)
सांगली शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील उच्च शिक्षित असणाऱ्या अक्षता चव्हाण आणि प्रशांत पाटील यांचा विवाह थाटामाटात झाला. अक्षता ही एमबीए असून पुणे येथे आयटी कंपनीत नोकरीस आहे. तिचे वडील अशोक चव्हाण हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. प्रशांत यांचे मुंबई येथे महा ई सेवा केंद्र असून त्याचे वडील आनंदा पाटील हे शेतकरी आहे.
लग्नमंडपापर्यंत बैलगाडीतून वरात
वधु– वर हे उच्च शिक्षित असताना ही अक्षताने ग्रामदेवतांचे दर्शन बैलगाडीतून जाऊन घेतले. नंतर वधुवर वऱ्हाडी मंडळीसह लग्नस्थळी बैलगाड्यातून रवाना झाले. यासाठी वाद्य म्हणून पारंपारिक असणाऱ्या लेझीमचा वापर करण्यात आला. त्यामुळे लेझीम आणि बैलगाडीची एन्ट्री हेच सर्वांचे आकर्षण ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.