Sangli News
Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: गावासाठी खोदली विहीर; कमी पडणारा निधी खिशातून टाकत पाणी प्रश्न लावला मार्गी

विजय पाटील

सांगली : गावच्या आजी- माजी सरपंच दाम्‍पत्याने मिळून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला आहे. सांगलीच्या (Sangli News) मिरज तालुक्यातल्या सलगरे येथे ग्रामपंचायत (Gram Panchayat) लोकवर्गणी आणि स्वखर्चातून भली मोठी विहीर खोदण्यात आली. आता या विहिरीत पुष्कळ पाणी साठा निर्माण झाल्याने सलगरे ग्रामस्थांचा उन्हाळ्यातल्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील पूर्व भाग तसा दुष्काळीचा आहे. या ठिकाणी म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी गावातुन गेले असले तरी तिच्या पाण्याची टंचाई आज देखील अनेक गावात जैस थे आहे. यापैकीच सलगरे या गावात दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे इथल्या महिलांना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

कमी पडणारा निधी दिला खिशातून

गावातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तानाजी पाटील यांनी विहीर खोदायचा निर्णय घेतला. मग शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या निकषाप्रमाणे छोटीशी विहीर खोदून गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नव्हता. म्हणून १२५ बाय ७५ फूट खोल विहीर गावातल्या तलावाच्या ठिकाणी खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाकडून विहीर खोदण्यासाठी निधी देण्यात येतो. मात्र शासनाकडून मिळणारा निधी हा अपुरा पडणार होता. त्यामुळे तानाजी पाटील यांनी लोक वर्गणी काढायचा निर्णय घेतला आणि कमी पडणारा निधी स्वतःच्या खिशातला घालायचा तयारी दर्शवली.

गावच्‍या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी

पाण्याची टंचाई दूर करून गावाच्या वाट्याला आलेली भटकंती गावचे आजी- माजी सरपंच असणाऱ्या दाम्पत्यांनी मिटवली आहे. माजी सरपंच तानाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी मनीषा पाटील या दोघांनीही ग्रामपंचायत लोकवर्गणी आणि स्वखर्चाच्या माध्यमातून तब्बल ५२ लाख खर्च करून विहिरी काढली आहे. आता भव्य अशी विहीर खोदून तयार झाली आणि यामध्ये आता ७० फूट खोल इतका पाणीसाठा देखील झाला आहे. हे पाणी गावातल्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडण्यात येतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT