Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: अल्पवयीन मुलाच्‍या हाती कारचे स्‍टेअरींग; सहाय्यक पोलीस निरीक्षकाला केले जखमी, पोलीस बॅरिकेटिंग तोडले

अल्पवयीन मुलाच्‍या हाती चार चाकीचे स्‍टेअरींग; सहाय्यक पोलीस निरीक्षकाला केले जखमी, पोलीस बॅरिकेटिंग तोडले

विजय पाटील

सांगली : सांगली मिरज कुपवाड रोड गांधी चौकजवळ अल्पवयीन मुलाने चार चाकी गाडी भरधाव वेगाने चालवून पोलीस बॅरिकेटिंग उडवले. यात मिरज (Miraj) वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे जखमी झाले आहेत. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. (Live Marathi News)

चार चाकी वाहन भरधाव वेगात सांगलीहून मिरजेला येत असल्याची माहिती सांगली पोलिसांनी मिरज पोलिसांना दिली. ही खबर समजताच मिरज शहर पोलीस कुपवाड रोड गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी केली. तर गाडीचा पाठलाग सांगली शहर पोलिसांची गाडी करत होती. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करून सुद्धा गाडी भरधाव वेगात मिरजेच्या दिशेने सुटली होती.

बॅरिकेटस्‌ लावूनही थांबला नाही

मिरज शहर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून सदर गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु भरधाव वेगात असलेल्या कारने पोलीस बॅरिकेटिंग उडविले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे जखमी झाले. गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला आणि गाडी अल्पवयीन तरुण चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतातील 'या' जागा आहे भयानक; येतात विचित्र आवाज

Maharashtra Live News Update: जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा जोरदार इशारा; विरोधकांनो, शिवसेना कधीही फुटणार नाही|VIDEO

Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT