Jalgaon News: २५ हजाराची लाच, ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ची कारवाई

२५ हजाराची लाच, ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ची कारवाई
Jalgaon News Bribe
Jalgaon News BribeSaam tv

कळमसरे (जळगाव) : नीम (ता. अमळनेर) येथील ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील यास वीटभट्टी चालकाकडून २५ हजारांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत विभागाने (ACB) पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून ग्रामसेवकास अटक करण्यात आली आहे. (Letest Marathi News)

तक्रारदार विटभट्टी चालकास ना हरकत दाखला देण्यासाठी १७ जानेवारीस ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी २७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सोमवारी (ता. २३) नीम ग्रामपंचायत कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदारांचा नीम ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३० वर्षांपासून वीटभट्टीचा व्यवसाय आहे.

Jalgaon News Bribe
Dhule Accident : भयंकर! भरधाव ट्रकने क्रुझरला उडवलं; २० ते २५ जण जखमी

रॉयल्‍टी भरल्‍यानंतरही

तक्रारदारांनी नियमाप्रमाणे अमळनेर तहसील कार्यालयात ६ हजार रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदारांना नीम ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसाय करायचा असेल; तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सांगितले. तसेच नीम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक राजेंद्र पाटील याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष २७ हजार ५०० रुपयांची मागणी केली. लाच मागणी केलेल्या रकमेपैकी २५ हजार रोख रक्कम पंचासमक्ष नीम ग्रामपंचायत कार्यालयात स्वत: स्वीकारताना पकडण्यात आले आहे. मारवड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दरम्यान, यासाठी सापळा व तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक (Jalgaon ACB) लाचलुचपत प्रतिबंध विभाग (जळगाव) शशिकांत पाटील, सहसापळा अधिकारी व पथक पोलिस अधीक्षक संजोग बच्छाव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, सचिन चाटे, कारवाई मदत पथक पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com