Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: चक्‍क गाढवांची औषधांसाठी तस्करी; पोलिसांनी टोळी केली जेरबंद

चक्‍क गाढवांची औषधांसाठी तस्करी; पोलिसांनी टोळी केली जेरबंद

विजय पाटील

सांगली : सांगलीतल्या चोराची नवीनच शक्कल निघाली आहे. चोरांनी चक्क गाढवावर डल्ला मारण्यास सुरवात केली आहे. तर ही चोरीची गाढव चक्क चीनमध्ये तस्करी करत आहेत. या टोळीला पकडण्यास (Sabgli) सांगली शहर पोलीस स्टेशनला यश आले आहे. आजपर्यंत जिल्ह्यात घरफोडी, दरोडा, चोरी असे प्रकार चोराच्या कडून घडत होते. आता चोरांनी चक्क गाढव चोरीकडे मोर्चा वळवला आहे. तर या गाढव चोरीमधून औषध निर्मित्ती, उत्तेजना वाढविण्यासाठी वापर होत असून (Crime News) मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sangli Crime News)

पंधरा हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत गाढवाच्या किंमती आहेत. गवत आणि लहान झुडपे खाऊन ते आपली उपजीविका करतात. पुणे आणि (Gujrat) गुजरातमध्ये गाढवांचा मोठा बाजार भरतो. तेथूनच प्रामुख्याने गाढवे सांगली जिल्ह्यात येतात. गाढवांची चोरी होऊ लागल्याने गाढव मालकांसमोर आर्थिक संकट उभा राहिले आहे. पूर्वी जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार गाढवांची संख्या होती. आज हा आकडा चार हजारांपर्यंत गेला आहे. तस्करी हेच मुख्य कारण असल्याने गाढवांची संख्या कमी झाली आहे. येथून गाढव चोरी करून थेट चीनमध्ये लाखो रुपये किंमतीला विक्री केली जात आहे. प्रामुख्याने आंध्र प्रदेश व हैद्राबाद हे तस्करीचे मुख्य केंद्र आहे.

गाढवीनीचे दूध गुणकारी औषध

कामाला एकदम मजबूत, कष्टाळू, मेहनती आणि आपले काम निमूटपणे करणारा प्राणी म्हणून गाढवाची ओळख आहे. ओझ्याच्‍या कामासाठी खेड्यापासून शहरांपर्यन्त गाढवाचा वापर होतो. वीट भट्टीवर, माती आणि वाळू वाहतुकीसाठी गावांचा प्रामुख्याने वापर केला जातो. २५ ते ४५ वर्षे असे गाढवाचे आयुष्य असते. गाढवीनीचे दूध लहान मुलांसाठी गुणकारी औषध मानले जाते. दररोज दोन चमचा या प्रमाणात तीन दिवसांसाठी दूध देण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये घेतले जातात. रक्तस्त्राव, चक्कर, निद्रानाश, कोरडा खोकला आणि महिलांमधील गर्भाशयाच्या आजारावर औषध तयार करण्यासाठी गाढवांच्या कातडीचा वापर केला जातो. शिवाय उत्तेजना वाढविण्यासाठीही गाढवाचे मांस फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

चारजण अटकेत

सांगलीत गाढव तस्करांकडून नऊ गाढवे आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील अन्य साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोलापूर जिल्हा कर्नाटक राज्यात रवाना झाले आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातून गाढवांची चोरी करून त्याची चीनमध्ये तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT