Shaktipeeth Expressway Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Dhairyashil Mane Video: 'देवाच्या नावाखाली घरांवर नांगर फिरवाल तर देवसुद्धा माफ करणार नाही', धैर्यशिल मानेंचा सरकारला घरचा आहेर

Shaktipeeth Expressway Latest News: समृद्धी महामार्गानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध पाहायला मिळत आहे. यावरुनच शिंदे गटाचे खासदार धैर्यशिल माने यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २२ जून २०२४

शिंदे सरकारचा महत्वाकांशी प्रकल्प असलेल्या नागपूर- ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवत कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा काढला होता. तसेच सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिंदे गटाचे खासदार धैर्यशिल माने यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

सांगलीत काँग्रेसचे आंदोलन!

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले धैर्यशिल माने?

"शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. पण हा शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणारा आहे. का शक्ती काढून घेण्याचा हा महामार्ग आहे? हे काही कळेना झाले आहे. पण देवांच्या नावाखाली आमच्या घरांवर कोणी नांगर फिरवत असेल तर देवसुद्धा त्याला माफ करणार नाही," अशी टीका खासदार माने यांनी केली.

कोल्हापुरात शेतकरी आक्रमक

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज कोल्हापुरमधील शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. शक्तीपीठ महामार्ग घालवायचा असेल तर सरकार घालवलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतायेत हे जनतेचे सरकार आहे मात्र ते जनतेचे नसून कंत्राटदारांचे सरकार असल्याचं आमचं ठाम मत आहे, असे म्हणत शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT