Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : दैव बलवत्तर! काळ होता पण वेळ नव्हती; प्रवाशांनी भरलेली बस विहिरीत कोसळताना थोडक्यात राहिली

Sangli News : सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला आहे. ३१ प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड- तासगाव ही बस मार्गस्थ झाली होती

विजय पाटील

सांगली : प्रवाशांनी भरून मार्गस्थ झालेल्या बसला अपघात झाला आहे. समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरून शेतातील विहिरीकडे गेली. सुदैवाने बस विहिरीच्या कठड्यावर जाऊन अडकली. अन्यथा बस थेट विहिरीत कोसळून ३१ प्रवाशांना जलसमाधी मिळून भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप आहेत.  

सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला आहे. ३१ प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड- तासगाव ही बस मार्गस्थ झाली होती. मात्र तासगावच्या अलीकडेच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटीच्या समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली. 

मोठी दुर्घटना टळली 

बसचा वेग अधिक असल्याने लागलीच थांबविणे चालकांना शक्य झाले नसल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या दिशेने गेली. मात्र मागील चाक रस्त्याच्याकडेला असणाऱ्या चारीत अडकल्याने समोर पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन बस थांबली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा मोठा अपघात होऊन बसमधील सर्वाना जलसमाधी मिळण्याची शक्यता होती. 

प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला 

दरम्यान अपघातग्रस्त बसमध्ये ३१ प्रवासी होते. या अपघातात चालकासह १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्याला मुका मार लागला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच विहिरीच्या कठड्याला बस अडकल्याने बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT