SDCC Bank Saam tv
महाराष्ट्र

SDCC Bank : बिगर शेती कर्जदारांची १०१६ कोटींची थकबाकी; वसुलीसाठी साडेचार हजार जणांवर बँकेची कारवाई

Sangli News : जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना करण्यात येत असलेला कर्ज पुरवठा या शिवाय बिगर शेती धारकांसाठी देखील कर्ज दिले जात असते. मात्र अनेकांनी कर्ज पुरवठा केल्यानंतर त्याची परतफेड करण्यात विलंब

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्हा बँकेकडून थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कर्ज थकबाकीदारांना नोटीस बजावून थकीत कर्जाची रक्कम भरण्याचे सांगितले जात आहे. मात्र थकबाकीदार रक्कम अजूनही भरत नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यात बिगर शेती कर्जदार असल्याने जिल्ह्यातील साडेचार हजार जणांवर जिल्हा बँकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. 

आर्थिक वर्ष समाप्तीवर आले असल्याने जिल्हा बँकेकडून वसुली मोहीम जोरदार करण्यात आली आहे. प्रामुख्याने जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना करण्यात येत असलेला कर्ज पुरवठा या शिवाय बिगर शेती धारकांसाठी देखील कर्ज दिले जात असते. मात्र अनेकांनी कर्ज पुरवठा केल्यानंतर त्याची परतफेड करण्यात विलंब केला जात असतो. परिणामी कर्जाची थकीत रक्कम वाढली आहे. हीच रक्कम वसुली मोहीम जिल्हा बँकेने सुरु केली आहे. 

१ हजार १६ कोटींची थकबाकी 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकित कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. तब्बल साडेचार हजार जणांवर वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगर शेतीचे १ हजार १६ कोटींची थकबाकी आहे. या कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक ऍक्शन मोडवर आली आहे. तब्बल ४ हजार ४८८ थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

४०४७ जणांवर दावे दाखल 

बिगर शेती कर्जदार असलेल्या साडेचार हजार थकबाकीदारांमध्ये सर्वाधिक ४ हजार ४७ जणांवर १०१ ची कारवाई करत दावे दाखल केले आहेत. तर २२९ जणांवर सेक्युरिटायझेशन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मार्च अखेर जवळ आल्याने दिल्या बँकेने आपली वसुलीची मोहीम आता अधिक तीव्र केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT