Water Shortage : शेतकरी पुन्हा संकटात; पाण्याअभावी उन्हाळी धान पीक धोक्यात

Bhandara News : मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्वत्र धान पिक संकटात सापडले होते. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चौरास भागात याचा फटका कमी प्रमाणात पडला होता
Water Shortage
Water ShortageSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : धान पिकाचे कोठार म्हणून भंडारा जिल्हा प्रसिध्द आहे. मात्र तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा उन्हाळी धान पिकाचे उत्पादन कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे येथील शेतकरी बारमाही धान पिकाचे उत्पादन घेत असतात. मात्र यावर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे आतापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याअभावी धान पीक धोक्यात सापडले आहे. 

मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्वत्र धान पिक संकटात सापडले होते. सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चौरास भागात याचा फटका कमी प्रमाणात पडला होता. पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरीतून पाणी बाहेर निघणे कमी झाले आहे. यावर्षी परिसरात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळी धान पिक जास्त प्रमाणात आहे. उन्हाळी पिक हातात येईल शेतकरी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

Water Shortage
Mahad Water Crisis : महाडच्‍या शेलभोगावात भीषण पाणीटंचाई; विहीर पडली कोरडी, पाणी विकत घेण्‍याची ग्रामस्‍थांवर वेळ

पाणी पातळी गेली खोल 

यंदाच्या हंगामात सुरुवातीला धानाचे पन्हे वातावरणामुळे जळाले होते. तरीही शेतकऱ्यांनी माघार न घेता उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. रोवणीला महिना पूर्ण होत नाही. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणामी पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. उन्हाळी धान पिकाला आतापासून पाणी पुरविणे अशक्य आहे. तर पुढे काय परिस्थिती राहील याबाबत अंदाज लावणे कठीण झाले आहे. पीक हातात येणार किंवा नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Water Shortage
Neera Canal : धक्कादायक! पाणी पुरवठा करणाऱ्या नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या; रामराजे नाईक निंबाळकरांच्या स्टेट्सने प्रकार उघड

शेतकऱ्यांसमोर संकटच संकट 

शेतकऱ्यांनी पैसे गोळा करून चांदपूर आणि बघेडा पाटबंधारे विभागाकडे पैसे देखील जमा केले आहे. परंतु आतापर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. तसेच भारनियमनाचा खरा फटका चौरास भागातील शेतकऱ्यांवर पडत आहे. दिवसेंदिवस भारनियमन वाढत आहे. सद्याला ७ ते ८ तास थ्री फेज विद्युत पुरवठा मिळत आहे. पुढे भारनियमन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी या चौरा भागात सिंचनाच्या सोयी करिता शेतकऱ्यानी कर्ज काढून विहिरी बनविल्या आहेत. मात्र भारनियमन वाढण्याच्या संकेताने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुन्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com