Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : शेतात अचानक आला मुलाचा रडण्याचा आवाज; कुटुंबाने जाऊन पाहिले असता समोर आला धक्कादायक प्रकार

Sangli News : झाबरे यांच्या घरा शेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचे त्याचा नातू विराज याच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांनी दिली. हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता समोर आला

विजय पाटील

सांगली : घराच्या जवळच असलेल्या शेतात लहान मुलं रडत असल्याचा आवाज अंगणात खेळत असलेल्या मुलाला आला. सदर बाब घरात सांगितल्यानंतर कुटुंबीय आवाजाच्या दिशेने गेले. लहान बाळ रडत असल्याच्या ठिकाणी गेले असता नवजात अर्भक पडलेले होते. इतकेच नाही तर याठिकाणी आणखी एक धक्कादायक प्रकार या कुटुंबाच्या नजरेस पडला. यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. 

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गोरगाव येथे सदरची घटना उघडकीस आली आहे. यात गोरगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक सापडले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तात्यासाहेब झाबरे यांच्या घरा शेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचे त्याचा नातू विराज याच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांनी दिली. हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता समोर आला. 

खोल खड्ड्याशेजारी होते अर्भक 

कुटुंबीय गेले असता सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचे प्रत्यक्ष दर्शनीचा अंदाज आहे. अर्भकाच्या शरीरावर व डोळ्यात माती गेली होती. विशेष म्हणजे अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खोदण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे त्या खड्ड्यात अर्भक पुरण्याचा हेतु असावा असा अंदाज आहे. झांबरे यांनी या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका बोलाविली. 

नवजात अर्भकाचा मृत्यू 

रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्भकाला पोलिस गाडीतुन रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अर्भक उपचारा दरम्यान मृत पावले. अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणे हा पोलिसांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे. पुरुष जातीचे अर्भक असल्याने असे कृत्य का केले? असेल अनेक तर्क घटनास्थळी लावले जात होते. घटनेची माहिती मिळताच बघ्यानी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Director Physical Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिलासा; कोर्टाकडून 'या' अटींसह अंतरिम जामीन

Beed : बीडमध्ये पुन्हा हाणामारी! गुंडांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, हॉटेलचीही केली तोडफोड

SCROLL FOR NEXT