MP Sanjay Patil Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही; खासदार संजय पाटील

सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही; खासदार संजय पाटील

विजय पाटील

सांगली : टेंभूचे पाणी काय स्वतःच्या सातबारावर कर्ज काढून आणले काय? असा खडा सवाल करत तुम्ही जेष्ठ आहात, (Sangli News) आम्ही तुमचा आदर करतो पण कुणाला तरी बघून घेतो. कुणाला तरी इन्कम टॅक्स लावतो, कुणाला काय? हे चालणार नाही. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे; असा इशारा (BJP) भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांना दिला. (Letest Marathi News)

खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे ‘माझे गाव माझा अभिमान’ या अंतर्गत गावातील आजी- माजी सैनिक, प्रशासकीय सेवेत कार्यरत व्यक्तींचा सत्कार खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या जाहीर कार्यक्रमांमध्ये खासदार पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर यांच्यावर सर्वच वक्त्यांनी तोंडसुख घेतले.

खासदार पाटील म्हणाले, हिंगणघाती हे गाव पूर्वी तुमच्याकडे होते परंतु अलीकडच्या काळात शंकर मोहिते यांनी काही तरुणांची फळी उभारून मोठे काम उभारले आहे. त्यांनी जिद्दीने आणि कष्टाने ग्रामपंचायत आणली. मात्र त्यांच्या लोकांना आता त्रास देणे सुरू आहे. परंतु, मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जेष्ठ आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण कुणाला तरी बघून घेतो, कुणाला तरी इन्कम टॅक्स लावतो. कुणाला काय? हे चालणार नाही. सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही. संघर्ष आमच्या रक्तात आहे. टेंभूच्या पाण्याचा उल्लेख अमरसिंह देशमुख यांनी केला. यावर फार मोठ भाष्य केलं पाहिजे असं काही नाही. पण आपण सगळ्यांनी मिळून ते आणलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल शानदार व्याजदर; 'या' बँकेने आणलीय धमाकेदार योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT