सांगलीमध्ये एका तरुणाच्या घरामध्ये विषारी साप सापडला. दोरी समजून या तरुणाने सापालाच उचलले. सुदैवाने सापाने चावा घेण्यासाठी तोंड पुढे केले पण तरुणाने हात मागे घेतल्यामुळे सुदैवाने तो बचावला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथील ही घटना आहे. सुमारे २० वर्षांनी अत्यंत दुर्मिळ फुरसे जातीचा साधारणता २५ सेंमी लांबीचा विषारी साप सापडला. या सापाला सर्पमित्रांनी पकडून त्याच्या अधिवासात सोडला आहे.
कुंडल गावामध्ये राहणाऱ्या प्रशांत गायकवाड याच्या घरामध्ये हा विषारी साप आढळला. बाहेर गेलेला प्रशांत संध्याकाळी घरी आला. घरात आल्यावर तो सोफ्यावर बसला. सोफ्याजवळील एका बॉक्सजवळ त्याला दोरीसारखे काहीतरी पडलेले दिसले. दोरी समजून तो ती उचलायला गेले अन् तेवढ्यात त्या विषारी सापाने प्रशांतच्या हाताच्या दिशेने आपले तोंड उचलले. चपळाईने प्रशांतने आपला हात पाठीमागे घेतल्याने तो बचावला.
प्रशांतने तात्काळ सर्पमित्र हणमंत माळी यांना फोन करुन बोलावले. त्यांनी या दुर्मिळ सर्पाविषयी माहिती दिली आणि घराशेजारीच डोंगर असल्याने तिथून तो आला असावा असे सांगितले. सर्पमित्राने हा साप पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडले. महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आढळतात.
नाग, मण्यार, घोणस हे विषारी सर्प सर्वत्र आढळत असले तरी फुरसे हा विषारी सर्प कोकण भागात जास्त प्रमाणात सापडत असल्याचे सर्पमित्र नीळकंठ जोंजाळ, तेजस फासे, वर्धन जोंजाळ यांनी सांगितले. या सर्पाचे खादय प्रामुख्याने विंचू, लहान किडे, सरडे, पाली आहेत. कुंडल येथील डोंगराळ परिसरात या सर्पाचे अस्वित्व असल्याचे समोर आले आहे. हे सर्प डोंगराळ भागातील दगडाखाली तसेच प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा अशा अनेक ठिकाणी लपून बसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.