Sangli News
Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli: बिबट्याच्या कातड्याची तस्करी; एकाला पोलिसांनी केली अटक

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजेत बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या एकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी (Police) अटक केले आहे. समीर नारकर असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून बिबट्याचे (Leopard) कातडे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या बिबट्याच्या कातड्याची किंमत 5 लाख 25 हजार रुपये आहे. (Sangli Today News)

सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी एक जण येणार असल्याची खात्रीलायक बातमी महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. पोलिस आणि वन विभागाच्या (forest Department) अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी सापळा लागला होता. त्या ठिकाणी संशयित व्यक्ती मोठी प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबलेला दिसला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ बिबट्याचे कातडे पोलिसांना मिळून आले. यानंतर पोलिसांनी सदर इसमास अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

Nilesh Lanke News | 'पोलिस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय' लंकेंची पोलिसांना धमकी

Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Vishal Patil News | वंचितचं ठरलं! विशाल पाटलांना देणार साथ

Today's Marathi News Live : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT