Jayant Patil on Eknath Shinde Sangali News Saam TV
महाराष्ट्र

Jaynat Patil News: शिंदेंनी एक्का काढला अन् आम्ही पत्त्यांचा डाव हरलो; जयंत पाटील असं का म्हणाले?

Jayant Patil on Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव हरलो आम्ही, असं जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात म्हटलं.

विजय पाटील

Jayant Patil on Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या रोखठोक भाषणामुळे कायम चर्चेत असतात. म्हणूनच जयंत पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. सोमवारी (४ सप्टेंबर) जयंत पाटील सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कसबे डिग्रज गावामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मिश्किल प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

सांगलीच्या कसबे डिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस होता. सर्व तयारी झाली होती मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव हरलो आम्ही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सोमवारी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय व आष्टा ग्रामीण रुग्णालयास 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या डायलिसिस मशीन व वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?

सांगलीच्या कसबे डिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस होता. सर्व तयारी झाली होती मात्र, एकनाथ शिंदे यांनी एक्का काढला आणि आम्ही मांडलेला पत्त्यांचा डाव हरलो आम्ही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले, असंही ते म्हणाले.

काही दवाखान्यात आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे, की कोणाच्या हॉस्पिटल मध्ये किती लोकं आत गेली आणि किती लोकं डायरेक्ट वर गेली. कोरोना काळात असेही काही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला, की गरीबांचा ऑक्सिजन काढून ते श्रीमंत व्यक्तीला लावायचे,असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये झाल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel : पनवेल महानगरपालिकेचा कारभार पुन्हा चर्चेत; 8 कर्मचाऱ्यांची अचानक पदावनती, पालिकेत नेमकं काय घडलं?

Hingoli : वखार महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाने शेतकऱ्यांचा माल सडला; गोडाऊनमध्ये शेकडो क्विंटल मालाची नासाडी

Diwali Cleaning Tips: घरात खूप जाळ्या लागल्यात? मग 'हा' घरगुती स्प्रे ठरेल सगळ्यात बेस्ट, वाचा टिप्स

Vajragad Fort History: महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा वज्रगड किल्ला, ट्रेकर्ससाठी खास, वाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Early signs of heart blockage: ब्लॉक होण्यापू्र्वी हार्ट देतं 'हे' 5 धोकादायक इशारे; चुकूनही दुर्लक्ष करू नका, महागात पडेल

SCROLL FOR NEXT