Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : जतमध्ये भाजपत होणार बंडखोरी; तमनगौडा रवीपाटील यांची अपक्ष उमेदवारी

Sangli News : विधानसभा निवडणुकीत यंदा बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसारच जतमध्ये देखील बंडखोरी समोर आली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी सभापती तमनगौडा रवीपाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तमनगौडा रवी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. 

विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha election) यंदा बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसारच जतमध्ये देखील बंडखोरी समोर आली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवणार; अशी भूमिका तमणगौडा रवीपाटील यांनी जाहीर केली आहे. (BJP) भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भूमिपुत्र विरुद्ध आयात असा संघर्ष जत विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला आहे. यातून स्थानिक भाजप इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीची थेट इशारा दिला होता. 

त्यानुसार रवी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे पडळकर यांना उमेदवारी दिल्यास या ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याची स्थिती तमनगौडा रवी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखलमुळे निर्माण झाली आहे. आता भाजप बंडखोरीच्या अनुषंगाने काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT