Sharad Pawar Sangli Visit:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar: 'आरक्षण कायद्यात दुरुस्ती करावी, आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा देऊ...' शरद पवारांचे सर्वात मोठे विधान

Sharad Pawar On Assembly Election 2024: कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला.

विजय पाटील

Sharad Pawar Sangli Visit: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, असे सर्वात महत्वाचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी आरक्षणावरुनही एक महत्वाचे विधान केले.

काय म्हणाले शरद पवार?

"मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे, तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही. 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही," असे शरद पवार म्हणाले.

"सरकारने लाडकी बहीण योजना काढली त्याचे सर्वांना स्वागत करावे लागले, पण तेवढ्यात भागात नाही. एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका आहे. मुलींवर वाढलेले अत्याचार हे गंभीर आहे. लाडक्या लेकीला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचे सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत," असा आरोप शरद पवार यांनी केला.

अमित शहांवर निशाणा..

"आज जे महाराष्ट्रात घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक सलोखा राखून सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. अमित शहा सध्या काहीही बोलत असतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा, पक्ष फोडा. ते कायदा व सुव्यवस्था कोठे नेऊन ठेवतात? देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, ते नेते अशी भाषा करतात. येत्या दीड महिन्यात याबाबत निकाल लावू," असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

छत्रपती संभाजी राजे, राजू शेट्टी एकत्रित आले तर परिणाम होणारच. आम्ही खूप अस्वस्थ झालोय आमच्या झोपा उडाल्या आहेत. पंतप्रधानांच्या राज्यात १८ सभा झाल्या आणि १४ ठिकाणी पराभव झाला त्यामुळे आमची विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात, असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Maharashtra Politics: मोठी बातमी! काँग्रेसचे २३ नगरसेवक नॉटरिचेबल; राजकीय वर्तुळात खळबळ

Sawantwadi : सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव बदलले, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता नवं नाव काय?

hotel food cost increase : इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका! खाद्यपदार्थांच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या, VIDEO

ना जीम, ना डाएट; फक्त 7 दिवस प्या 'सब्जा आणि तेजपत्ता' ड्रिंक, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

SCROLL FOR NEXT