Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या म्यानमार केमिकल कंपनीत रात्रीच्या सुमारास वायू गळती झाली होती.

संभाजी थोरात

सांगली/कराड : सांगली जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने 9 लोक अत्यवस्थ झाले होते. यामधील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सांगली (Sangli News) जिल्ह्यातील शाळगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या म्यानमार केमिकल कंपनीत रात्रीच्या सुमारास वायू गळती झाली होती. वायू गळती झाल्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना त्रास जाणवू लागला होता. दरम्यान वायू गळतीमुळे ९ जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यातील ७ जणांना अत्यवस्थ जाणवू लागल्याने रात्री (Karad) कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आले आहे.

दोन महिलांचा मृत्यू
वायू गळतीमुळे अधिक त्रास जाणवू लागल्याने सुचिता उथळे (वय ५०, राहणार येतगाव, जिल्हा सांगली) व नीलम रेठरेकर (वय २६ रा. मसूर, जिल्हा सातारा) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paithani Contrast Blouse: पैठणी साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा? रेखीव लुकसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स

Hill Station: गुलाबी थंडीत बाहेर जायचा प्लान करताय? मुंबई-पुण्याजवळ 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

Ruchak Rajyog: 7 दिवसांनंतर मंगळ बनवणार ‘रूचक महापुरुष राजयोग’, गाडी, बंगला, पैसा सर्वकाही मिळणार

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

SCROLL FOR NEXT