corona positive
corona positive 
महाराष्ट्र

पाचवीतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवस शाळेला सुट्टी

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : खंडेराजुरी (ता. मिराज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilha Parishad School) एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शाळा परिसर सील करण्यात आला. तसेच दोन दिवस शाळेला सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाचवीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून या अहवालात विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर शाळेला दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अन्य विद्यार्थी निगेटिव्ह

शालेय व्यवस्थापन समितीने इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्वच म्हणजे 44 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र खंडेराजुरी ते तपासणी केलेल्या 44 विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण

एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या मार्फत शाळा खोल्या व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT