Farmer Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Farmer Rasta Roko : पाण्यासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर; रस्ता रोको आंदोलनात पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट

Sangli News : तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे

विजय पाटील

सांगली : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणी टंचाईची समस्या सगळीकडे भेडसावत आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली असून पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं, तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) आज रस्ता रोको आंदोलन केले.

शेतकरी, पोलिसात वाद 

रास्ता रोको आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये (Police) यावेळी जोरदार वादावादीचा आणि झटपटीचा प्रकार देखील घडला आहे. शेतकरी संतप्त असल्याने आपल्या आंदोलनावर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईकरांची मोठी अडचण कायमची मिटली! ३ नवीन महाप्रकल्प सेवेत; पाहा तुमचा कोणता प्रवास सोपा होणार?

Nagpur Fort : नागपूरच्या मध्यभागी उभा असलेला शौर्याचा साक्षीदार, 'या' किल्ल्यावर गेल्यावर अनुभवा समृद्ध इतिहास

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरमधील यशच्या 'त्या' सीनची तुफान चर्चा; प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक, वाचा रिव्ह्यू

Single teacher schools: देशभरात तब्बल १ लाखांहून अधिक शाळा एकाच शिक्षकावर! महाराष्ट्रात काय परिस्थिती? पाहा धक्कादायक आकडेवारी

SCROLL FOR NEXT