Swabhimani Shetkari Sanghatna Saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatna : शेतकऱ्यांची कर्ज माफी नाकारली; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काळी गुढी उभारून निषेध

Sangli News : राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये लाभ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार; असे म्हणून सत्ता स्थापन केली. मात्र लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांना फसवून सरकार सत्तेवर आले आहे

विजय पाटील

सांगली : लाडक्या बहिणीला आणि शेतकऱ्याला राज्य सरकारने फसवुन सत्तेवर आले आहे. लाडक्या बहिणींना मानधन देता येणार नाही. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज गुढीपाडव्यानिमित्ताने सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुडी उभारून निषेध करण्यात आला आहे. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये लाभ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देणार; असे म्हणून सत्ता स्थापन केली. मात्र लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांना फसवून सरकार सत्तेवर आले आहे. आता या सरकारने लाडक्या लाडक्या बहिणीना मानधन देता येणार नाही. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. असे जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. 

आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा 

शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्याचे जाहीर केल्यानंतर याचा निषेध सर्व राज्यभरातून स्वाभिमानी शेतकरी संघटना करत आहे. दरम्यान आज सांगलीमध्ये काळी गुढी उभा करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यापुढेही तीव्र असे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला.

राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी 

राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, संजय बेले, संदीप राजोबा आदिसह अन्य शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: देवदर्शनापूर्वीच भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित कार नदीत कोसळली; चौघांचा मृत्यू

Gold Rate Today: वसुबारसेलाच ग्राहकांना मोठा झटका! २४ तासांत सोनं ७ हजारांनी, तर चांदी १५ हजारांनी महागली

Maharashtra News Live Update: जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

Aadhaar Update : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे झाले आता अत्यंत सोपे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Satej Patil: वोट चोरीनंतर आता सत्ता चोरीचा प्रयत्न; गोकुळच्या वादावरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT