Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News : वाहून जाणारे पुराचे पाणी मिळण्याची मागणी; जतच्या संखमध्ये दुष्काळग्रस्तांचा रास्ता रोको

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या एका बाजूला कृष्णा व वारणा नद्यांना पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला भर पावसाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली आहे. पुराचे वाहुन जाणारे पाणी मिळावं; या मागणीसाठी जतच्या संखमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून व्हस्पेट आणि गुड्डापूर तलाव भरून (Sangli) देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांकडून सहा महिन्यांपूर्वी २६ कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता. मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. महापुरामध्ये कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी म्हैसाळ सिंचन योजनेतून मिळावे, या प्रमुख मागणीसाठी हे रस्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आलं.

सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संख मध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू; असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT