Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli : पशुखाद्य खाताच विषबाधा; ९ गायींचा काही वेळातच मृत्यू

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील अंत्री बुद्रुक येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्याकडे १७ गायी आहेत. यातील ९ गायी या दुभत्या आहेत. या गायींना रोज पशुखाद्य देण्यात येत असते.

विजय पाटील

सांगली : दुभत्या गाईंना पशुखाद्य टाकल्यानंतर ते खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात गाईंचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील अंत्री ब्रूद्रुक येथे घडली आहे. ९ गाईंचा मृत्यू झाल्याने पशुपालक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील अंत्री बुद्रुक येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्याकडे १७ गायी आहेत. या गायींना रोज पशुखाद्य देण्यात येत असते. गोट्यामधील एकूण १७ गाईपैकी यातील ९ गाई या दुभत्या आहेत. तर तर बाकीच्या ८ गायी या गाभण (गरोदर) आहेत. यांना दोन्ही वेळेस वेगवेगळे खाद्य देण्यात येत असते. नियमितपणे दिले जाणारे खाद्य आज सकाळी देखील गायींना टाकण्यात आले. 

शेतकरी मोरे यांनी ९ गाईना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते. हे खाद्य खाल्यानंतर अवघ्या पंधरा- वीस मिनिटात पोट फुगून गायींचा मृत्यू झाला. तर उर्वरित आठ गायी या सुरक्षित आहेत. दरम्यान ९ गायींचा मृत्यू झाल्याने दत्तात्रय मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती गावामध्ये समजताच लोकांनी गोट्यावर गर्दी केली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी घटना स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मोरे यांना धीर दिला. 

पशुखाद्य कंपनीवर कारवाईची मागणी 

सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्यामला खोत, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, विराज नाईक, पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती अधिकारी आणि सरपंच सुजाता पाटील, यांनी तात्काळ भेट दिली. तर यावेळी पशुखाद्य कंपनीवर कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update: अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

SCROLL FOR NEXT