Miraj Crime Saam tv
महाराष्ट्र

Miraj Crime : भरदिवसा बुरखाधारी महिलांकडून सराफ दुकानात डल्ला; सीसीटीव्हीत घटना कैद

Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या सराफ पेठ येते बद्रीनाथ कट्टी यांचे सोने- चांदीचे दागिने विक्रीचे सराफ दुकान आहे. गुढीपाडवा तसेच रमजान ईद असल्याने दागिने खरेदीसाठी महिला वर्ग सराफ दुकानात येत आहेत

विजय पाटील

मिरज (सांगली) : भर दिवसा चोरट्यांकडून दुकानात शिरून वस्तू लांबविल्या जात आहेत. असाच प्रकार सांगलीच्या मिरजेत घडला असून भरदिवसा बुरखाधारी महिलानी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. सराफ दुकानातून दागिने चोरी केले असून हि संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या सराफ पेठ येते बद्रीनाथ कट्टी यांचे सोने- चांदीचे दागिने विक्रीचे सराफ दुकान आहे. गुढीपाडवा तसेच रमजान ईद असल्याने दागिने खरेदीसाठी महिला वर्ग सराफ दुकानात येत आहेत. अशातच दुपारी अचानक ऐन सणासुदीच्या माहोलाचा फायदा घेत चोरटयांनी संधी साधून दुकानात प्रवेश करत दागिने चोरी केले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

बुरखाधारी महिलांसह एक पुरुषाचा सहभाग 

दरम्यान कट्टी यांच्या सराफ दुकानात चार बुरखाधारी महिला व अन्य एक पुरुष यांनी दुकानात प्रवेश केला. यानंतर त्यांनी मालक कट्टी यांना बोलण्यात गुंतवून एका महिलेस पायातील जोडवे, पैंजण दाखविण्यास सांगितले. यानंतर कट्टी हे दागिने दाखवत असताना त्यांना बोलण्यात गुंतवून तिजोरीतील हातोहात चार लाख रुपयांचे ८० ग्राम वजनाचे सोन्याच्या रिंगा, बाली लंपास केल्या आहेत. हे पाचही चोरटे दुकानातून बाहेर पाडल्यानंतर दागिने चोरी झाल्याचे सराफाच्या लक्षात आले.  

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद 

प्रकार लक्षात आल्यानंतर कट्टी यांनी लागलीच दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता बुरखाधारी महिलांनी चोरी केल्याचे लक्षात आले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच आधारे पोलीस तपास करत आहेत. भर दिवसा अशा प्रकारे धाडसी चोरी केल्याने सराफ व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT