Sangli News  Saam tv
महाराष्ट्र

Sangli : '180 वडापाव, 30 प्लेट मिसळपाव...'; नाष्टा सेंटर चालकांना ऑर्डर घेणे पडले महागात, शहरभर फसवणुकीची चर्चा

सैन्य दलामधून बोलतोय म्हणत नाष्टा सेंटर चालकांना चुना लावण्याचा प्रकार सांगलीच्या पलूसमध्ये घडला आहे.

विजय पाटील

Sangli Crime News : सैन्य दलामधून बोलतोय म्हणत नाष्टा सेंटर चालकांना चुना लावण्याचा प्रकार सांगलीच्या पलूसमध्ये घडला आहे. पलूस शहरातील तीन नाष्टा सेंटर चालकांना कॉल करण्यात आला. मी भारतीय सैन्यदलामधून विक्रम वाघमारे बोलतोय असे त्याने सांगितले.

त्यानंतर भली मोठी नाष्टाची लिस्ट देऊन ऑर्डर मागितली. पण ना पैसे दिले, ना नाष्टा घेतला, उलट पैसे गुगल पेवर त्याने मागितले. त्यानंतर नाष्टा सेंटर वाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं कळले. त्यानंतर नाष्टा सेंटर चालकांनी पोलिसात धाव घेतली. (Latest Marathi News)

नाष्टा सेंटर चालकांना विश्वासात घेण्यासाठी वाघमारे याने आपल्या आर्मी कँटीनच्या ओळखपत्राचा फोटोही पाठवला. आर्मीचा जवान बोलतोय आणि ओळखपत्र पाठावतोय हे पाहून सर्वच नाष्टा सेंटर चालक भारावून गेले. त्यांनी कोणतीही आगाऊ रक्कम घेतल्या शिवाय खाद्यपदार्थ आर्डर स्वीकारली. विक्रम वाघमारेनेही दणकून आर्डर देत ११ पर्यंत आर्डर तयार ठेवायला सांगितली.

यानंतर सांगलीच्या (Sangli) कुंडलवेस पलूस येथील यशवंती नाष्टा सेंटरच्या फल्ले यांना 180 वडापाव, 60 प्लेट कांदा भजी, 30 प्लेट बटाटा भजी आर्डर दिली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील गंधर्व नाष्टा सेंटर चालकाला 30 प्लेट पोहे, 40 प्लेट उपीट, 30 प्लेट मिसळपाव आर्डर दिली.

या सर्वांनीच आर्मीचं काम म्हणून तत्परतेनेच वेळेआधी ऑर्डर तयार करून विक्रम वाघमारेशी संपर्क साधला. मात्र पेमेंट प्रॉब्लेम असल्याचे सांगत त्याने संबंधित सेटरचालकांना बँक (Bank) डिटेल, एटीम डिटेल्स मागितल्या. तसेच तुम्ही मला 2000 पाठवा, मी तुम्हाला 4000 पाठवतो असे सांगितले.

यानंतर सेंटर चालकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र केलेले पदार्थ खराब होणार असल्याने पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्या कडे कोणताही पर्याय नव्हता. सर्वांनी पलूस पोलिसांकडे धाव घेतली असून अद्यापपर्यंत या ठकसेन विक्रम वाघमारे विरूद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.

गुगलवर विक्रम वाघमारे याचे नाव सर्च करताच आर्मी जवान असल्याचे भासवून त्याने केलेल्या अनेक फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. या सर्व नाष्टा सेंटर चालकांचा नंबर वाघमारेला कसा मिळाला हा ही संशोधनाचा विषय आहे. एकूणच या फसवणूकीची चर्चा शहरात रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT