Sangli Accident News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: टँकरचे चाक निखळून विचित्र अपघात; डोक्‍याला मार लागल्‍याने महिला ठार, तर एक गंभीर जखमी

टँकरचे चाक निखळून विचित्र अपघात; डोक्‍याला मार लागल्‍याने महिला ठार, तर एक गंभीर जखमी

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील झरे येथे ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. ज्यामध्ये ट्रकने तीन वाहनांना जोरदार धडक (Accident) दिली. त्यानंतर भरधाव वेगात असलेल्या टॅंकरची मागील बाजूची चाके निखळून एक महिला ठार (Accident Death) झाली आहे. तर एक जण जखमी झाली आहे. तर या अपघातात दोन वाहनांचा चक्कचुर झाला. (Live Marathi News)

आटपाडी (Sangli) तालुक्यातील झरे येथील एका कृषी केंद्रासमोर रस्त्यावर भरधाव आलेल्या टँकरने पहिल्यांदा एका गाडीला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये राणी पवार या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर वाघजाई बोरवेलच्या समोर टीव्हीएस लुना गाडीलाही टँकरने उडवले. यावेळी टँकरचे मागील डाव्या बाजूला असलेली चाके निखळले आणि त्या चाकाची संगीता पवार यांच्या डोक्याला जोरदार धडक बसली. यामुळे त्यांचा मृत्यु झाला.

तरुणांनी पाठलाग करून पकडले

टँकर चालकांनी वेगाने आपली गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातला तरुणांनी टँकरचा पाठलाग करून आणि टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये टँकर चालक सुरेश सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

SCROLL FOR NEXT