सांगली : विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात असून शिक्षक आणि संस्था चालकाकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या कवठेमंकाळमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थाचालक आणि शिक्षकाविरोधात तक्रार दिली असून संस्थाचालक आणि दोन शिक्षकांसह तिघांच्या वरती कवठेमंकाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील कवठेमहांकाळ- जत रस्त्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या स्कूलमध्ये जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आणि संस्था चालकांकडून नाहक त्रास आणि मारहाण केली जाते; असा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.
दरम्यान संस्थाचालक मोहन माळी यांनी काल विद्यार्थ्यांना नाकातून रक्त येईपर्यंत जबरदस्त मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. यात पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्याची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून याचा अहवाल सायंकाळी येणार आहे. या बरोबरच विद्यार्थ्यांना किडे असलेले जेवण दिले जात होते; अशीही माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. याबाबत संस्था चालक मोहन माळी यांच्यासह दोन शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत १८ विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार नोंदवली आहे.
मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव
दरम्यान या प्रकारामुळे अनेक पालक येथील शाळा प्रवेश रद्द करून इतर शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार देण्यात आली असून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव ही देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे. समिती संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. तर गटशिक्षणाधिकारी तालुका विभागाकडून शाळेची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. अहवाल आल्यावर बाल हक्क कायदा आणि फोकसो यानुसार कारवाई करण्यात येईल; अशी माहिती शिक्षण अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.