Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणी ३ साखर कारखान्यांसह 12 जणांना प्रतिवादी; हरित न्यायालयाचे आदेश

कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणी ३ साखर कारखान्यांसह 12 जणांना प्रतिवादी; हरित न्यायालयाचे आदेश

विजय पाटील

सांगली : ऐन पावसाळ्यामध्ये सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये लाखो मासे मृत्युमुखी झाल्याचा प्रकार घडला होता. याबाबत दाखल याचिकेवर हरित न्‍यायालयाने नदी काठावरील तीन साखर कारखाने, नगरपालिका, सांगली महानगरपालिका असे मिळून बारा जणांना प्रतिवादी करण्याचे आदेश दिले आहेत. (Live Marathi News)

कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरणाबाबत प्रदूषण महामंडळाकडून (Sangli) माशांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे माश्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये धाव घेतली होती. जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी असणारे (Sugar Factory) साखर कारखाने, नगरपालिका आणि सांगली महापालिका यांच्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आणत याचिका दाखल केली होती.

न्‍यायालयाने दिले आदेश

या प्रकरणी आता हरित न्यायालयामध्ये याचिकेवरून न्यायालयाने जिल्ह्यातले कृष्णा काठचे तीन साखर कारखाने, नगरपालिका, सांगली महानगरपालिका अशा बारा जणांना प्रतिवादी करण्याचे आदेश जारी केले आहेत. अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे यांनी दिली आहे. त्याचबरोबर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नवनाथ अवताडे यांनी मासे मृत्यू प्रकरणी खोटी माहिती दिल्याने त्यांचे निलंबन करावे; अशी मागणी ही सुनील फराटे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Sonalee Kulkarni: हॉट अन् बोल्ड सोनाली कुलकर्णी, लेटेस्ट फोटोंनी उडवली झोप

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Virat Kohli: विराट पुन्हा शून्यावर आऊट; एडिलेड वनडेनंतर घेणार निवृत्ती? विकेटनंतर क्राऊडला केलेल्या इशाऱ्यामुळे चर्चांना उधाण

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

SCROLL FOR NEXT