Sangli Miraj News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Miraj News : पाणी प्रदूषित झाल्याने ६०० किलो मासे मृत; मिरजेतील गणेश तलावमध्ये मृत माशांचा खच

Sangli News : दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छता मोहीम राबवून ६०० किलो पेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत

विजय पाटील

सांगली : मिरजेतील गणेश तलावमध्ये पाणी प्रदूषणामुळे अचानकपणे मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाणी प्रदूषित झाल्याने दोन दिवसात सुमारे ६०० किलो मासे मृत झाल्याचे समोर आले आहे. मात्र याचे नेमके कारण शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. तर या घटनेनंतर गणेश तलावमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला.

सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश तलावमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मागील दोन दिवसापासून मासे मृत होत आहेत. तलावातील पाणी प्रदूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावमध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे ६०० किलो पेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेकडून कारवाईचा इशारा 

गणेश तलावमध्ये कचरा, धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टाकले जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. सांगली महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच यापुढे पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यावर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी दिला. 

कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंडाचा वापर करावा; अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. तरी देखील गणेश तलावमध्ये कचरा टाकला जातो. तलाव परिसरातील खाऊंच्या गाड्या ही गणेश तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मूडमध्ये आले असून गणेश तलावमध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजया यादव यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT