Sangli News, Sangli Miraj Kupwad Municipal Corporation saam tv
महाराष्ट्र

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation : थकबाकीदारांचे नाव चाैकात झळकणार; जाणून घ्या सांगली महापालिकेचा कठाेर निर्णय

थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने पथकांची नियुक्ती केली आहे.

विजय पाटील

Sangli News : घरपट्टी, पाणीपट्टी कराची (tax) थकबाकीची वसुली व्हावी यासाठी सांगली महापालिकेने (sangli miraj kupwad municipal corporation) आजपासून थकबाकीदारांचे बोर्ड भरवस्तीत चौकात झळकविण्याचा निर्णय घेतला आहे. याबराेबरच थकीत रक्कम लवकरात लवकर न भरल्यास मिळकतधारकाचे पाणी (water) कनेक्शन ताेडण्याचा कठाेर निर्णय घ्या असा आदेश आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. (Maharashtra News)

महापालिकेने आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील एक लाख मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. चाळीस हजार ग्राहकांना थकबाकी न भरल्यास त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने पथकांची नियुक्ती केली आहे. वसुलीबाबत कुचराई केल्यास कायम कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ रोखा तसेच मानधन कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करा असे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी प्रशासकीय बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आजपासून थकीत कर वसूल करण्यासाठी (sangli) महापालिका कर्मचारी मिळकतधारकांच्या घरापर्यंत पाेहचू शकतात असे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक

Mahalakshmi Express : मध्यरात्री थरार! महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडा; महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

गरोदरपणानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? यामागचे कारण काय?

Monday Horoscope: डोकं शांत ठेवा! पैशांच्या अडचणी कमी होतील; वाचा आजचे राशीभविष्य

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

SCROLL FOR NEXT