sangli krushi utpanna bazar samiti election news saam tv
महाराष्ट्र

Sangli APMC Election: 9 माजी संचालकांना दणका; सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची रंगत वाढली

यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

विजय पाटील

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (sangli krushi utpanna bazar samiti election) मिरज, जत, कवठेमहांकाळ येथील 18 जागांसाठी 590 इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. (Breaking Marathi News)

या अर्ज छाननीत 590 पैकी 510 अर्ज वैध ठरले आहेत. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती, दुबार अर्ज तसेच उमेदवारांच्या हरकती असलेल्या अर्जाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज निवडणूक निर्णय अधिकारी महेश सूरवसे यांनी निकाल दिला.

त्यामधे 2015 ते 2022 या कालावधीतील 9 माजी संचालक या पंचवार्षिक निवडणुकीला अपात्र ठरले आहेत. या 9 माजी संचालकांना अर्ज छाननीत अपात्र करण्यात यावे अशी हरकत काननवाडी माजी सरपंच अनिल शेगुंशी यांनी घेतली होती.

मागील संचालक मंडळाने कोट्यवधीच्या ठेवी मोडून खाऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेंगुनशी यांनी केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुरवसे यांच्या समोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला.

अनिल सेंगुनशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर सादर केलेली सबळ कागदपत्रे पुरावे नुसार 9 माजी संचालकांना या निवडणुकीत अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये बाळू रामचंद्र बंडगर , मुजिर अप्पासाहेब जांभळीकर, अजित बनसोडे, अण्णासाहेब कोरे, संतोष पाटील, अभिजीत चव्हाण वसंत गायकवाड दीपक हरिबा शिंदे प्रशांत शेजाळ या माजी संचालकांवर अपात्रतेची कार्यवाही झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

SCROLL FOR NEXT