सांगलीतील जतमधील उमदीत एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाणी नाही... चक्क पेट्रोल बाहेर येतंय... होय... विहिरीतील पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात पेट्रोल बाहेर येतंय. पाण्यात पेट्रोलच्या वाढत्या प्रमाणामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचं समोर आलंय. मात्र, तक्रारीनंतरही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केलाय.. एव्हंढच नव्हे तर परिसरात मोठा अनर्थ घडल्यास त्याला कोण जबाबदार... असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय..
या विहिरीपासून अवघ्या सुमारे 300 मीटर अंतरावर HP पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीतून किंवा पाइपलाइनमधून पेट्रोलची गळती होऊन ते विहिरीत येत असावे, असा अंदाज नागरिक व शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, संबंधित कंपनीच्या पथकानं पेट्रोल पंपाची तपासणी करून पंपामध्ये गळती नसल्याचा अहवाल दिल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे, पेट्रोल पंप तपासणीसाठी बंद ठेवल्यानंतर विहिरीतील पेट्रोलचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र, आता पुन्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल विहिरीत येऊ लागल्यानं या प्रकरणाचं गूढं आणखी वाढलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.