Sangli bike dumper accident Saam Tv News
महाराष्ट्र

Sangli Accident : बाईकने जाताना काळाची झडप, डंपरच्या धडकेनं भीषण अपघात; आईसमोर दोन्ही लेकरांसह नवऱ्याचा करुण अंत

Sangli Bike Accident News : सांगलीत बाईक आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वडिलांसह दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे.

Prashant Patil

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली : सांगलीतून भीषण अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या आष्टा येथे दुचाकी आणि डंपरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला आहे, तर आई गंभीर जखमी झाली आहे. इस्लामपूर-आष्टा रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. अश्फाक पटेल (वय ३९), अशरफ पटेल (वय १२) आणि असद पटेल (वय १०) असं ठार झालेल्या बाप लेकांची नावे आहेत.

अश्फाक पटेल हे आपल्या पत्नी आणि दोन्ही मुलांसह दुचाकीवरून आष्टाहून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. शिंदे मळा याठिकाणी समोरून आलेल्या भरधाव डंपरची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. ज्यामध्ये अश्फाक पटेल आणि त्यांची दोन लहान मुलं जागीच ठार झाली. तर पत्नी हसीना पटेल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघातामुळे उपस्थितांच्या अंगाला देखील काटा आला. आईच्या डोळ्यांसमोर आपल्या दोन्ही लेकरांचा आणि नवऱ्याचा करुण अंत झाल्याने महिलेला धक्का बसलाय.

उभ्या जेसीबीला स्कॉर्पिओची धडक

दरम्यान, काल वाशिममध्ये असाच एक भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये हा अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओमधील एकाचा मृत्यू तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. स्कॉर्पिओ लोणारच्या दिशेने भरधाव वेगावे जात असताना उभ्या जेसीबीला धडकून हा भीषण अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींना वाशिम येथील रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. यातील एकजण ठार आणि दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT