Sangli Accident  Saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

Sangli Accident : सांगलीत अपघाताची थरारक घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगलीत अपघाताचा थरार

मद्यधुंद कार चालकाने ४ ते ५ वाहनांना उडवलं

बालाजी मिल रोडवर घडला अपघात

अपघातात ५ ते ६ जण जखमी

सांगलीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने ४ ते ५ वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. सांगली शहरातील बालाजी मिल रोडवर रविरारी रात्री ही घटना घडली. अपघातात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्यानंतर आता सांगलीतही भीषण अपघाताची घटना घडलीये. सांगलीत मद्यधुंद वाहन चालकाने मद्यधुंद अवस्थेत चार ते पाच वाहनांना धडक दिली. मद्यधुंद कार चालकाने ४ ते ५ गाड्यांना उडवल्याने रस्त्यावर उपस्थित नागरिक संतापले. संतप्त नागरिकांनी वाहनाची तोडफोड केली. सांगलीतील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मद्यधुंद कार चालकाने दुचाकी वाहनाधरक आणि पादचाऱ्यांनाही उडवलं. या अपघातात चार ते पाच जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. त्यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग केला. अपघातानंतर संतप्त लोकांनी त्याचा रस्त्यात अडवून त्याच्या कारची तोडफोड केली.

लोकांनी मद्यधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगलीकर हादरून गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT