Krishna and Warana River Water Storage Saamtv
महाराष्ट्र

Sangli Rain News: अलर्ट! कृष्णामाय भरली, वारणा नदीही पात्राबाहेर, अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Krishna and Warana River Water Storage: सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २१ जुलै २०२४

सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कृष्णानदीसह वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वारणा नदीवरील काखे-मांगले, कुंडलवाडी पूलासह अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

धरण क्षेत्रात चोवीस तासात 66 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 23.54 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 1 हजार 396 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे.

कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे.धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून १ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

SCROLL FOR NEXT