Sangali Solar projec Tree Cutting Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात

Sangali Solar project Tree Cutting : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात सौरऊर्जा प्रकल्पासाठी २० वर्षांपासून ग्रामस्थांनी वाढवलेली १२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत.

Alisha Khedekar

  • बलगवडे गावात सोलार प्रकल्पासाठी १२,०००+ झाडे तोडली गेली

  • २० वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरणातून ग्रामस्थांनी गायरानात वृक्षारोपण व संगोपन केले होते

  • प्रशासनाला अंधारात ठेवून प्रकल्प राबवल्याचा गंभीर आरोप

  • प्रकल्प स्थलांतर व पुनर्वनीकरण न झाल्यास निवडणूक बहिष्कार व नेत्यांना गावबंदीचा इशारा

विजय पाटील, सांगली

जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आ वासून उभा आहे. निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. सरकारनंही 'झाडं लावा, झाडं जगवा'ही मोहीम हाती घेतली आहे. पण याच सरकारमधील लोक खुलेआम आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता झाडांची बेमालूम कत्तल करत सुटले आहेत. नाशिकमधील तपोवनात हजारो झाडांच्या प्रस्तावित तोडीला राज्यभरातून विरोध होत असताना, सांगली जिल्ह्यात शे-दोनशे नाहीत, तर १२००० झाडांची कत्तल केलीय.

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्याचा उद्योग सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये झाला आहे. तब्बल बारा हजारांहून अधिक झाडं बलगवडे येथे सौरऊर्जा प्रकल्पासाठी तोडली आहेत. ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार करण्यात आला आहे.

तासगाव तालुक्यातील बलगवडे हे साधारण चार हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावात वीस वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत ग्रामस्थांनी गायरान जमिनीमध्ये हजारो झाडं लावली. या गावातील महिलांसह ग्रामस्थांनी पोटच्या लेकरासारखं या वृक्षांचं संगोपन केलं. बिहार पॅटर्ननुसार त्यांनी ही झाडं वाढवली.तब्बल वीस वर्षे त्या महिलांचं कार्य अविरत सुरू होतं.पण मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळं गायरान जमिनीवरील जवळपास १२ हजारांहून अधिक झाडे तोडली आहेत.

विशेष म्हणजे गावकऱ्यांनी यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठरावही केला होता. या ठिकाणी पर्यायी जागेची व्यवस्था असताना हजारो झाडांच्या कत्तली का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणही केले. यासाठी खुद्द माजी आमदार आणि माजी खासदार यांनी आंदोलनस्थळी जाऊन तहसीलदार यांच्या समक्ष प्रशासनाला विनंती करून आंदोलन स्थगित केले आहे.

तर आंदोलकांच्या मागणीनुसार हा प्रोजेक्टच स्थलांतर करून वृक्षतोड थांबवण्यासाठी आश्वासनही देण्यात आले. पण वास्तविक पुन्हा बळाचा वापर करून पोलीस बंदोबस्तात हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या आहेत.संबंधित कंपनीने निसर्गाची हानी करून नुकसान करून सौर ऊर्जा प्रकल्प केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नेतेमंडळींनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वृक्षतोड थांबवून प्रकल्प स्थलांतरित करून, पुन्हा वृक्षारोपण करावे; अन्यथा नेत्यांना गावबंदी करून येऊ घातलेल्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्त येवल्यातील हिंदू जनजागृती समितीचा तहसिलवर मोर्चा

बांग्लादेशात हिंदूंवरअत्याचार, मंदिरं जाळली, घरं तोडली, 1 कोटी 31 लाख हिंदूंचं अस्तित्व धोक्यात

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

जगाची झोप उडवणारी एपस्टीन फाईल उघड, मुलींचे रेट ते बड्या नेत्यांच्या चॅटचा पर्दाफाश

New Year Tourism: लोणावळ्यापासून 20 किमीतील Hidden ठिकाणे, 31st ला करा मित्रांसोबत धमाल

SCROLL FOR NEXT