Sangli Fox Attack News
Sangli Fox Attack News Saam TV
महाराष्ट्र

Fox Attack On Women: थरारक! आईला वाचवण्यासाठी मुलीने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याशी दिली झुंज! गळा पकडला अन्....

Chandrakant Jagtap

>> विजय पाटील, सांगली

Sangli Fox Attack On Women: जन्मदात्या आईने मुलीला वाचवल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. परंतु आईल वाचवण्यासाठी मुलीने थेट कोल्ह्याशी झुंज केल्याची घटना सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये घडली आहे. येथील कोंगनोळी येथे एका मुलीने कोल्ह्याच्या तावडीत सापडलेल्या आईचे प्राण वाचवले आहेत.

सांगलीच्या कवठेमहांकाळमधल्या कोंगनोळी या ठिकाणी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने महिलेवर हल्ला चढवला. हे पाहून तिथे असलेली महिलेची मुलगी धावून आली आणि तिने थेट कोल्ह्याचा गळाच धरला. यानंतर कोल्ह्याला पळवून लावत आपल्या आईचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंगनोळी येथील आटपाडकर वस्तीवरील सुरेखा लिंगाप्पा चौरे या त्यांच्या मुलीसोबत पहाटेच्या सुमारास बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा चौरे यांच्यावर हल्ला केला. कोल्ह्याने सुरेखा यांच्या हाताचा चावा घेत त्यांच्या हाताचे बोट तोंडात धरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी घाबरून गेले. (Sangli News)

परंतु मुलीने स्वत:ला सांभाळले आणि आईचे प्राण वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आली. आईवर हल्ला करणाऱ्या कोल्हचा थेट गळा आवळा. यामुळे कोल्याने आईचे बोड सोडले. यानंतर कोल्हा आणि मुलीत जोरदार झुंज झाली.

यावेळी सुरेखा यांनी आरडाओरडा करत बाजूला पडलेले दगड आणि काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. आईने उगारलेली काठी आणि मुलीचे रौद्र रूप पाहून कोल्हा तेथून पळून गेला. या मुलींने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचे प्राण वाचले. तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Today's Marathi News Live: बीडमध्ये तिहेरी अपघातात; 1 ठार तर 3 जण जखमी

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT