Sangli : वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मोठ्या जमीनदारांचा त्रास; आत्मदहनाचा इशारा!
Sangli : वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मोठ्या जमीनदारांचा त्रास; आत्मदहनाचा इशारा! विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मोठ्या जमीनदारांचा त्रास; आत्मदहनाचा इशारा!

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : गावगुंड शेतात येऊ देत नाहीत, पोलीस कारवाई करत नाहीत, ऊभे पिक गावगुंड चोरून नेत आहेत. या सगळ्या प्रकारच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कापुसखेड येथील वृद्ध शेतकरी दांपत्य शेतातच आत्मदहन करणार आहे. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला या दाम्पत्याने आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला असून, याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व विभागांना त्यांनी निवेदन दिले आहे.

हे देखील पहा :

रामचंद्र तातोबा नायकवडी आणि त्यांची पत्नी सौ. आनंदी नायकवडी असे या दांपत्याचे नाव आहे. नायकवडी यांची गावापासून दूर बहे गावच्या हद्दीत सोळा गुऺठे  जमीन आहे.. ही जमीन कुलमुखत्यार म्हणून सौ. नायकवडी यांच्या नावावर आहे. या जमीनी शेजारच्या बड्या शेतकऱ्यांनी नायकवडी यांना जमीनीत येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यातूनही पिक घेतले तर ते रात्री कापून नेले जाते. याबाबत इस्लामपूर पोलीसात वारंवार तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत.

मात्र या बड्या शेतकऱ्याच्या दबावाला बळी पडून पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. या बाबत गेल्या तेरा वर्षात विविध न्यायालयांनी नायकवडी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. एका खटल्यात तर या लोकांना न्यायालयाने दऺडही ठोठावला आहे. तरीही आमचा त्रास कमी झाला नसल्याची खंत नायकवडी यांनी व्यक्त केली आहे. आमच्या शेताला-शेत लागून असणारे इसम गुऺड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहे. त्यामुळे आम्ही आता आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहोत. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला आम्ही आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

Pune Porsche Car Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

साताऱ्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस, आनेवाडीनजीक होर्डिंग काेसळले; वाघोली जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून गेले

Salapur News: तरुणी तलावाजवळ आली अन् थेट पाण्यात उडी घेतली; सोलापूर शहरातील खळबळजनक घटना

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट; गुन्हा दाखल होताच आरोपीचे वडील पसार, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT