Pune : रिक्षावाल्यांनी पोलिसांसाठी आयोजित केली १ कोटी बक्षिसाची स्पर्धा!

रिक्षावाला स्पर्धेचे बक्षीस वितरण चक्क शरद पवारांच्या हस्ते!
Pune : रिक्षावाल्यांनी पोलिसांसाठी आयोजित केली १ कोटी बक्षिसाची स्पर्धा!
Pune : रिक्षावाल्यांनी पोलिसांसाठी आयोजित केली १ कोटी बक्षिसाची स्पर्धा!सागर आव्हाड

पुणे : लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांसाठी "माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरात मागील काही दिवसात रिक्षा चालकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून रिक्षावाला संघटनेकडून पोलिसांसाठीच तब्बल एक कोटी रुपये बक्षीस असणारी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लष्कर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून "पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे" अशी विडंबनात्मक स्पर्धा ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ राबवत आहे. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये फायनान्स कंपन्यांच्या गुंडागर्दी विरोधात तक्रारी दाखल झाल्या असतील त्या पोलिस ठाण्यांचा गौरव आम्ही करणार आहोत, असं संघटनेचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत पोलिसांनी पोलिसांचं काम करावे व रिक्षावाल्यांची प्रतिमा स्पर्धा घेऊन खराब करू नये.

हे देखील पहा :

पुणे पोलीस रिक्षावाल्यांची स्पर्धा घेऊन रिक्षावाल्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचं वाटत आहे. पुणे पोलिसांनी फायनान्स कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. माहितीच्या अधिकारात पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयाने माहिती दिली आहे. फायनान्स कंपनीविरुद्ध पोलीस गुन्हे का दाखल करत नाहीत, म्हणून ही स्पर्धा आम्हाला घ्यावी लागली आहे. असे, वाट बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसात अनेक रिक्षा चालकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये यासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने रिक्षा चालकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पुणे शहर पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या सूचनेनुसार नागरिकांना रिक्षात प्रवास करताना सुरक्षित वाटले पाहिजे. रिक्षा चालकांची प्रतिमा उंचवावी व पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या नियमाचे पालन करण्याची सवय व्हावी. यासाठी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षा चालक व मालक यांच्यासाठी नवरात्रोस्तव २०२१ निमित्त "माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१" या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आम्ही आमचं काम करत आहोत, रिक्षावाले त्यांचं काम करतील असं पोलीस आयुक्तांनी सांगितले. जनतेच्या मनात रिक्षावाल्या बद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून पोलीस आणि रिक्षावाला संवाद वाढावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Pune : रिक्षावाल्यांनी पोलिसांसाठी आयोजित केली १ कोटी बक्षिसाची स्पर्धा!
Lonavla : घटस्थापनेला उघडणार कार्ल्यातील एकविरा देवी मंदिर

पुणे पोलिसांची रिक्षा स्पर्धा नेमकी काय आहे ?

स्पर्धेतील बक्षिसे

प्रथम क्रमांक रु ११०००, द्वितीय रु ५०००, तृतीय रु ३००० या बक्षिसांसह, ५ उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी १००० व ५०० रुपयांची देण्यात येणार आहेत.

बघतोय रिक्षावाला संघटनेचं स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षीस :

'उपमुख्यमंत्री प्रामाणिक पोलिस ठाणे चषक', बक्षिसाची रक्कम एक कोटी रुपये

पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतील पोलीस चौक्यांनी सहभागी होण्याचे आव्हान रिक्षावाला संघटनेचे आवाहन

ज्या पोलिस चौक्यांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्या पोलीस चौकीत कमीत कमी एक केस, दिनांक 21 ऑगस्ट 2020 ते 21 ऑगस्ट 2021 पर्यंत फायनान्स कंपन्यांच्या गुंडांविरोधात नोंदली गेलेली असावी.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com